अखंड सावधाबता

Verses

Holy Kural #५३१
सुखासीन बनून सावधगिरी न ठेवणे फार वाईट. अतिक्रोधाहूनही अशी बेसावधगिरी वाईट असते.

Tamil Transliteration
Irandha Vekuliyin Theedhe Sirandha
Uvakai Makizhchchiyir Sorvu.

Explanations
Holy Kural #५३२
दारिद्रयामुळे आकलनशवती मरते, त्याप्रमाणे सुरक्षित्तेच्या खोटया कल्पनेने तुमचे वैभव नष्‍ट होतो.

Tamil Transliteration
Pochchaappuk Kollum Pukazhai Arivinai
Nichcha Nirappuk Kon Raangu.

Explanations
Holy Kural #५३३
जो दक्ष नाही त्याला भाग्य नाही. जगातील सर्व विचारवंतांनी हा निर्णय दिला आहे.

Tamil Transliteration
Pochchaappaark Killai Pukazhmai Adhuulakaththu
Eppaalnoo Lorkkum Thunivu.

Explanations
Holy Kural #५३४
किल्लेकोट असून भ्याडाला काय उपयोग? जो दक्ष नि सावध नसतो, त्याला साधनांची विपुलता असूनही काय उपयोग?

Tamil Transliteration
Achcha Mutaiyaarkku Aranillai Aangillai
Pochchaap Putaiyaarkku Nanku.

Explanations
Holy Kural #५३५
जो आधीपासून दक्ष राहात नाही, तो संकट आल्यावर आपल्या निष्‍काळजीपणासाठी रडत बसेल.

Tamil Transliteration
Munnurak Kaavaadhu Izhukkiyaan Thanpizhai
Pinnooru Irangi Vitum.

Explanations
Holy Kural #५३६
सर्वांच्या बाबतीत नेहमी जागरुक असणे फार चांगले.

Tamil Transliteration
Izhukkaamai Yaarmaattum Endrum Vazhukkaamai
Vaayin Adhuvoppadhu Il.

Explanations
Holy Kural #५३७
ज्यांचे मन सदैव सावधान नि दक्ष असते, त्याला या जगात अशक्य काही नाही.

Tamil Transliteration
Ariyaendru Aakaadha Illaipoch Chaavaak
Karuviyaal Potrich Cheyin.

Explanations
Holy Kural #५३८
विचारवंतांनी जे करायला सांगितले आहे ते राजाने परिश्रमपूर्वक नेहमी करावे. जर तो दुर्लक्ष करील तर सात जन्म पस्तावावे लागेल.

Tamil Transliteration
Pukazhndhavai Potrich Cheyalventum Seyyaadhu
Ikazhndhaarkku Ezhumaiyum Il.

Explanations
Holy Kural #५३९
निश्‍चिंत असावे, कशाची काळजी करू नये, असे तुला वाटले तर बेफिकीर राहिल्यामुळे ज्यांचा सर्वनाश झाला, त्यांची उदाहरणे डोलयांसमोर आणीत जा.

Tamil Transliteration
Ikazhchchiyin Kettaarai Ulluka Thaandham
Makizhchchiyin Maindhurum Pozhdhu.

Explanations
Holy Kural #५४०
मनुष्य ध्येयाला सदैव डोळयांसमोर ठेवील तर ते प्राप्‍त करून घेणे त्याला खरोखर कठीण नाही.

Tamil Transliteration
Ulliyadhu Eydhal Elidhuman Matrundhaan
Ulliyadhu Ullap Perin.

Explanations
🡱