अधःपतित जीवन

Verses

Holy Kural #१०७१
अधःपतित लोक दिसायला अगदी इतर माणसांप्रमाणेच असतात; परंतु जीवनात केवढा फरक!

Tamil Transliteration
Makkale Polvar Kayavar Avaranna
Oppaari Yaanganta Thil.

Explanations
Holy Kural #१०७२
सदसद्विवेकबुद्धीला मानणान्यांपेक्शा हे पापी लोक किती सुखी! यांना हृदयाची टोचणी नाही, मनाची बोचणी नाही.

Tamil Transliteration
Nandrari Vaarir Kayavar Thiruvutaiyar
Nenjaththu Avalam Ilar.

Explanations
Holy Kural #१०७३
पृथ्वीवरचे दुष्‍ट, नीच लोक म्हणजे जणू देव; कारण स्वतःचा कायदा ते स्वतःच करतात.

Tamil Transliteration
Thevar Anaiyar Kayavar Avarundhaam
Mevana Seydhozhuka Laan.

Explanations
Holy Kural #१०७४
त्या पाप्याहून मी किती अधिक पापी, असे मनात येऊन पापशिरोमणी स्वतःला धन्य मानील.

Tamil Transliteration
Akappatti Aavaaraik Kaanin Avarin
Mikappattuch Chemmaakkum Keezh.

Explanations
Holy Kural #१०७५
अधःपतित लोक भीतीमुळे आणि लालसेमुळे सारे करीत असतात. परंतु भीतीचाच हेतू प्रभावी असतो.

Tamil Transliteration
Achchame Keezhkaladhu Aasaaram Echcham
Avaavuntel Untaam Siridhu.

Explanations
Holy Kural #१०७६
नीच लोक वाद्याच्या नादाप्रमाणे असतात. त्याच्याजवळ गुप्‍त म्हणून काही सांगाल, तर लगेच जगभर त्यांचा ते डांगोरा पिटतील.

Tamil Transliteration
Araiparai Annar Kayavardhaam Ketta
Maraipirarkku Uyththuraikka Laan.

Explanations
Holy Kural #१०७७
नीच लिक त्यांचे थोबाड फोडणान्यांसमोरच वाकतील. बाकी कोणला ते हाताला लागलेली शितेही देणार नाहीत.

Tamil Transliteration
Eerngai Vidhiraar Kayavar Kotirutaikkum
Koonkaiyar Allaa Thavarkku.

Explanations
Holy Kural #१०७८
शहाण्याला शब्दाच्या एका इशान्याने सांगता येते; परंतु नीचाला उसाप्रमाणे चिरडावे लागते.

Tamil Transliteration
Sollap Payanpatuvar Saandror Karumpupol
Kollap Payanpatum Keezh.

Explanations
Holy Kural #१०७९
शेजान्याला नीट खायला, प्यायला आहे असे पाहताच नीच लोक त्याची कुटाळकी करायला, त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला तयार होतात.

Tamil Transliteration
Utuppadhooum Unpadhooum Kaanin Pirarmel
Vatukkaana Vatraakum Keezh.

Explanations
Holy Kural #१०८०
आपत्ती आली असता नीच मनुष्य एकच गोष्‍ट करतो: तो लगेच स्वतःला दुसन्याचा गुलाम म्हणून विकतो.

Tamil Transliteration
Etrir Kuriyar Kayavarondru Utrakkaal
Vitrarku Uriyar Viraindhu.

Explanations
🡱