अप्रकट विचार समजणे

Verses

Holy Kural #१२७१
प्रिये, तू कितीही स्वतःचे विचार छपविण्याचा प्रयत्न केलास तरी या डोळयांवर तुझी सत्ता दिसत नाही; तुझ्या हृदयात काहीतरी चमत्कारिक विचार आहेत ही गोष्‍ट तुझे डोळे मला सांगत आहेत.

Tamil Transliteration
Karappinung Kaiyikan Thollaanin Unkan
Uraikkal Uruvadhon Runtu.

Explanations
Holy Kural #१२७२
(ती बोलत नाही. तो तिला उद्देशून म्हणतो) जिचे सौंदर्य माझ्या डोळयांत भरून राहिले आहे, जिचे बाहू कळकीप्रमाणे सरळ नि बारीक आहेत, अशा या मुग्धेच्या ठिकाणी स्त्र्रियांना न शोभण्याइतका मनाचा कुठेपणा का?

Tamil Transliteration
Kanniraindha Kaarikaik Kaamperdhot Pedhaikkup
Penniraindha Neermai Peridhu.

Explanations
Holy Kural #१२७३
स्फटिकाच्या मण्यांमधून घागा दिसतो, त्याप्रमाणे तिच्या हृदयातील विचार मला स्पष्‍टपणे दिसत आहेत. (पती पुन्हा जाईल की काय असा विचार)

Tamil Transliteration
Maniyil Thikazhdharu Noolpol Matandhai
Aniyil Thikazhvadhondru Untu.

Explanations
Holy Kural #१२७४
कळीत अप्रकट सुगंध साठवलेला असतो. त्याप्रमाणे या मुग्धेच्या अर्धस्मितात अर्थ भरून राहिला आहे.

Tamil Transliteration
Mukaimokkul Ulladhu Naatrampol Pedhai
Nakaimokkul Ulladhon Runtu.

Explanations
Holy Kural #१२७५
ज्या चतुराईने मनातील विचार तिने लपवले, त्याच चतुराईने प्रकट केले. ते सारे पाहून माझ्या मनाची चिंता दूर झाली.

Tamil Transliteration
Seridhoti Seydhirandha Kallam Urudhuyar
Theerkkum Marundhondru Utaiththu.

Explanations
Holy Kural #१२७६
तो फार केवळ्या मनाचा नि गोड स्वभावचा आहे. त्याच्या मनात काहीतरी आहे; परंरु ते त्याला लपविता येत नव्हते. तो पुन्हा सोडून जाईल की काय?

Tamil Transliteration
Peridhaatrip Petpak Kalaththal Aridhaatri
Anpinmai Soozhva Thutaiththu.

Explanations
Holy Kural #१२७७
त्याचा निष्‍ठुरपणा मला कळला त्यापेक्षा कितीतरी आधी हातांतील या कंकणांना कळला.

Tamil Transliteration
Thannan Thuraivan Thanandhamai Namminum
Munnam Unarndha Valai.

Explanations
Holy Kural #१२७८
प्रियकर काल गेला; परंतु शरीराची टवटवी आठवडयापूर्वीच सोडून गेली आहे.

Tamil Transliteration
Nerunatruch Chendraarem Kaadhalar Yaamum
Ezhunaalem Meni Pasandhu.

Explanations
Holy Kural #१२७९
(प्रियेची सखी प्रियकराला एकटयालाच म्हणते) तिने स्वतःच्या कंकणांडे पाहिले नि आपल्या कृश व कोमल बाहूंकडे पाहिले; नंतर आपल्या पायांकडे पाहिले.

Tamil Transliteration
Thotinokki Mendholum Nokki Atinokki
Aqdhaan Tavalsey Thadhu.

Explanations
Holy Kural #१२८०
(तो सखीला म्हणतो) तिने मला विरहदुःखे निवेदिली. तुम्है पुन्हा जाणार असाल तर मलाही बरोबर न्या, असे तिने प्रार्थिले; परंतु हे सारे शब्दांनी न सांगता तिने आपल्या डोळयांची सांगून विनयाच्या बाबतीत सान्या स्त्रियांना लाजविले.

Tamil Transliteration
Penninaal Penmai Utaiththenpa Kanninaal
Kaamanoi Solli Iravu.

Explanations
🡱