आप्‍तेष्‍टांना संतुष्‍ट ठेव

Verses

Holy Kural #५२१
विपत्तीतही स्नेहसंबंध ठेवणे हे आपल्या रक्‍ताचे आप्‍तच करू शकतील.

Tamil Transliteration
Patratra Kannum Pazhaimaipaa Raattudhal
Sutraththaar Kanne Ula.

Explanations
Holy Kural #५२२
ज्यांचे प्रेम जुगारी नाही असे प्रेमळ आप्‍त तर त्याचे भाग्य नेहमी वाढवत जाईल.

Tamil Transliteration
Virupparaach Chutram Iyaiyin Arupparaa
Aakkam Palavum Tharum.

Explanations
Holy Kural #५२३
जो मनुष्य आपल्याला आप्‍तांजवळ मिळूनमिसळून वागत नाही, त्यांचे प्रेम संपादू शकत नाही, तो बांध नसलेल्या तळयाप्रमाणे आहे. त्याचे भाग्य वाहून जाईल.

Tamil Transliteration
Alavalaa Villaadhaan Vaazhkkai Kulavalaak
Kotindri Neernirain Thatru.

Explanations
Holy Kural #५२४
कुटुंबियांना, आप्‍तांना एकत्र आणणे, त्यांचे प्रेम संपादणे, हा संपत्तीचा हेतू नि उपयोग आगे.

Tamil Transliteration
Sutraththaal Sutrap Pataozhukal Selvandhaan
Petraththaal Petra Payan.

Explanations
Holy Kural #५२५
मनुष्य उदार नि जिएचा गोड असेल तर सारे आप्‍त त्याच्या भोवती गोळा होतील.

Tamil Transliteration
Kotuththalum Insolum Aatrin Atukkiya
Sutraththaal Sutrap Patum.

Explanations
Holy Kural #५२६
जो कुरकूर न करता उदारपणाने देतो त्याच्यासारखा सखा नि आप्‍त या जगात दुसरा कोण?

Tamil Transliteration
Perungotaiyaan Penaan Vekuli Avanin
Marungutaiyaar Maanilaththu Il.

Explanations
Holy Kural #५२७
स्वार्थी बनून कावळासुद्धा आपला तुकडा आपल्या जातभाईपासून लपवून ठेवू इच्छीत नाही; तर प्रेमाने सर्वांसह खातो. समानशील लोकांपाशी भाग्य राहते.

Tamil Transliteration
Kaakkai Karavaa Karaindhunnum Aakkamum
Annanee Raarkke Ula.

Explanations
Holy Kural #५२८
आप्‍त असले तरी त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुरूप राजाने त्यांना वागवावे. कारण आपणांस मिळालेल्या सवलती नि अधिकार दुसन्यांस मिळू नयेत असे काहींना वाटते.

Tamil Transliteration
Podhunokkaan Vendhan Varisaiyaa Nokkin
Adhunokki Vaazhvaar Palar.

Explanations
Holy Kural #५२९
रागावून सोडून गेलेल्या आप्‍ताला परत आणण्याचा सोपा उपाय आहे. ज्यामुळे स्नेहभाव दूर झाला होता ते कारण दूर करणे.

Tamil Transliteration
Thamaraakik Thatrurandhaar Sutram Amaraamaik
Kaaranam Indri Varum.

Explanations
Holy Kural #५३०
एकदा फुटून निधून गेलेला आप्‍त परत आला तर त्याला जवळ करावे, परंतु जरा जपून त्याच्याजवळ वाफ़ावे.

Tamil Transliteration
Uzhaippirindhu Kaaranaththin Vandhaanai Vendhan
Izhaith Thirundhu Ennik Kolal.

Explanations
🡱