एकत

Verses

Holy Kural #११०१
या तरुणीच्या ठिकाणी सारे सुखानंद एकत्रित झाले आहेत. तिच्या हातातील कंकणे कशी चमकत आहेत पाहा.

Tamil Transliteration
Kantukettu Untuyirththu Utrariyum Aimpulanum
Ondhoti Kanne Ula.

Explanations
Holy Kural #११०२
ज्या करणाने रोग होतो, त्याच्याहून भिन्न अशा गोष्‍टीत त्या रोगावरचा उपाय असतो; परंतु ही तरुणीच विव्हल करते; नि सुखही तीच देऊ शकेल.

Tamil Transliteration
Pinikku Marundhu Piraman Aniyizhai
Thannoikkuth Thaane Marundhu.

Explanations
Holy Kural #११०३
प्रियेच्या कोमल बाहुपाशात जी माधुरी आहे, तिच्याहून अधिक त्या सत्यलोकात तरी आहे का?

Tamil Transliteration
Thaamveezhvaar Mendrol Thuyilin Inidhukol
Thaamaraik Kannaan Ulaku.

Explanations
Holy Kural #११०४
ती दूर असली म्हणजे जाळते, जवळ असली तर शांत करते! असला विचित्र अग्नीतिने कोठे बरे मिळविला?

Tamil Transliteration
Neengin Theru?um Kurukungaal Thannennum
Theeyaantup Petraal Ival?.

Explanations
Holy Kural #११०५
माझ्या प्रियेची मोहकता कोण वर्णील? तिने केसांत फुले घातली आहेत. ज्या ज्या आकाराची इच्छा करावी तो तो तिच्या ठायी मला दिसतो.

Tamil Transliteration
Vetta Pozhudhin Avaiyavai Polume
Thottaar Kadhuppinaal Thol.

Explanations
Holy Kural #११०६
त्या अल्लड प्रियेचे बाहू जणू अमृताचे आहेत; कारण त्यांचा प्रत्येक स्पर्श मला नवजीवन देतो, माझ्या मृतवत शरीरत चैतन्य ओततो.

Tamil Transliteration
Urudhoru Uyirdhalirppath Theentalaal Pedhaikku
Amizhdhin Iyandrana Thol.

Explanations
Holy Kural #११०७
या सुंदरीचे आलिंगन अत्यंत आनंददायक आहे. अतिथीला देऊन उरलेले सेवन करणान्या गृहस्थाश्रमी मनुष्यास जसा आनंद होतो, तसा तिच्या दृढालिंगनात मला होतो.

Tamil Transliteration
Thammil Irundhu Thamadhupaaththu Untatraal
Ammaa Arivai Muyakku.

Explanations
Holy Kural #११०८
वान्यालही ज्या आलिंगनात वाव नसतो, अशा दृढ आलिंगनात परस्परऐक्याचा आनंद भरलेला असतो.

Tamil Transliteration
Veezhum Iruvarkku Inidhe Valiyitai
Pozhap Pataaa Muyakku.

Explanations
Holy Kural #११०९
प्रेमकलहातील कपाळावरच्या आठया, नंतर हृदय द्रवणे, आणि मग मिळणारे पुनरालिंगन, या अमृतमय गोष्‍टी प्रेमी युगुलच जाणे.

Tamil Transliteration
Ootal Unardhal Punardhal Ivaikaamam
Kootiyaar Petra Payan.

Explanations
Holy Kural #१११०
मनुष्य अधिकाधिक विद्वान होत असता, स्वतःचे अधिकाधिक अज्ञान त्याला दिसू लागते; त्याप्रमाणे तिच्या संगतीत मी जितका जास्त रमतो, तितके अधिकच तिचे प्रेम माझ्यावर जडते.

Tamil Transliteration
Aridhoru Ariyaamai Kantatraal Kaamam
Seridhorum Seyizhai Maattu.

Explanations
🡱