कर्माचे पावित्र्य

Verses

Holy Kural #६५१
दुसन्याशी मैत्री जोडल्याने यश येते; परंतु आपली कृती शुद्ध असेल तर सर्व मनोरथ पूर्ण होतील.

Tamil Transliteration
Thunainalam Aakkam Tharuum Vinainalam
Ventiya Ellaan Tharum.

Explanations
Holy Kural #६५२
ज्या कर्मांपासून शाश्‍वत सुख नि कीर्ती लाभणार नाहीत, त्यांच्यापासून पराङ्‌मुख हो.

Tamil Transliteration
Endrum Oruvudhal Ventum Pukazhotu
Nandri Payavaa Vinai.

Explanations
Holy Kural #६५३
या जगात परमोच्च पदू शोभावे असे ज्यांना वाटते, त्यांनी कलंक लावणान्या सर्व कर्मांपासून दूर राहावे.

Tamil Transliteration
Oodhal Ventum Olimaazhkum Seyvinai
Aaadhum Ennu Mavar.

Explanations
Holy Kural #६५४
वस्तूंचे यथार्थ स्वरूप जाणणारे, वाईट दिवस आले तरीही वाईट कृत्ये करायला प्रवृत्त होणर नाहीत.

Tamil Transliteration
Itukkan Patinum Ilivandha Seyyaar
Natukkatra Kaatchi Yavar.

Explanations
Holy Kural #६५५
"अरेरे! काय मी केले?" असे पाठीमागून ज्या कृत्यांमुळे रडत म्हणावे लागेल, त्यांपासून आधीच दूर राहावे. असे कृत्य एकदा हातून झाले असले तरी फिरून करू नये.

Tamil Transliteration
Etrendru Iranguva Seyyarka Seyvaanel
Matranna Seyyaamai Nandru.

Explanations
Holy Kural #६५६
सज्ञ लोक ज्या कृत्यांस निंद्य नि त्याज्य समजतात, ती कधी करू नयेत; भुकेने तळमळणारे आईवे प्राण वाचवावयाचे असले तरीही ती कर्मे करू नयेत.

Tamil Transliteration
Eendraal Pasikaanpaan Aayinunj Cheyyarka
Saandror Pazhikkum Vinai.

Explanations
Holy Kural #६५७
अन्याय्य मार्गाने मिळविलेल्या सपत्तीपेक्षा थोरांचे दारिद्रयही श्रेयस्‍कर होय.

Tamil Transliteration
Pazhimalaindhu Eydhiya Aakkaththin Saandror
Kazhinal Kurave Thalai.

Explanations
Holy Kural #६५८
श्रेष्‍ठ नीतिधर्म ज्या गोष्‍टी करू नये म्हणून सांगते, त्या करून जरी तुम्ही यशस्वी झालात तरी शेवटी तुम्हांस पस्तावावे लागेल.

Tamil Transliteration
Katindha Katindhoraar Seydhaarkku Avaidhaam
Mutindhaalum Peezhai Tharum.

Explanations
Holy Kural #६५९
दुसन्यांना छळून, पिळून, रडवून जे मिळवाल, ते तुमच्या हातांतूनही जाईल आणि जाताना तुम्हांलाही ढळढळा रडवील; परंतु खन्या धर्माने जोडलेले जरी मध्येच गेले तरी पुन्हा येईल आणि वाढेल.

Tamil Transliteration
Azhak Konta Ellaam Azhappom Izhappinum
Pirpayakkum Narpaa Lavai.

Explanations
Holy Kural #६६०
कपटाने संपत्ती मिळवू बघणे म्हणजे कच्चा मडक्यात पाणी ठेवण्याप्रमाणे आहे.

Tamil Transliteration
Salaththaal Porulseydhe Maarththal Pasuman
Kalaththulneer Peydhireei Yatru.

Explanations
🡱