दूर असलेल्या प्रियेसाठी सुस्कारे

Verses

Holy Kural #१२०१
केवल स्मरणानेही प्रेम अनंत आनंद देते, अतिमधुर वाटते. प्रेम हे मदिरेपेक्षा मधुर आहे.

Tamil Transliteration
Ullinum Theeraap Perumakizh Seydhalaal
Kallinum Kaamam Inidhu.

Explanations
Holy Kural #१२०२
प्रियेची मूर्ती अंतश्‍चक्षूंसमोर आणताच माझे शमते. खरोखरच प्रेम हे सर्वतोपरी आनंददायी असते.

Tamil Transliteration
Enaiththonaru Inidhekaan Kaamamdhaam Veezhvaar
Ninaippa Varuvadhondru El.

Explanations
Holy Kural #१२०३
शिंक येणार होती, परंतु गेली. तो बहुधा माझी आठवण काढणार होता, परंतु काढली नसावी.

Tamil Transliteration
Ninaippavar Pondru Ninaiyaarkol Thummal
Sinaippadhu Pondru Ketum.

Explanations
Holy Kural #१२०४
माझ्या हृदयात्तो कायमचा आहे; परंतु त्याच्या हृदयात मला स्थान आहे का?

Tamil Transliteration
Yaamum Ulengol Avarnenjaththu Ennenjaththu
Oo Ulare Avar.

Explanations
Holy Kural #१२०५
तो असूयेने, ईर्ष्येने स्वतःच्या हृदयातून मला दूर करतो; मग माझ्या हृदयात आपले रूप सदैव दाखवायला त्याला लाज कशी वाटत नाही?

Tamil Transliteration
Thamnenjaththu Emmaik Katikontaar Naanaarkol
Emnenjaththu Ovaa Varal.

Explanations
Holy Kural #१२०६
आमच्या मीलनाची स्मृती मला जिवंत ठेवीत आहे; माझ्या जीवनाला अन्य आधार नाही. (सखी म्हणते, 'त्याचे स्मरणच करू नको' त्याला हे उत्तर आहे.)

Tamil Transliteration
Matriyaan Ennulen Manno Avaroti Yaan
Utranaal Ulla Ulen.

Explanations
Holy Kural #१२०७
माझ्या स्मृतीत तो भरून राहिला आहे तरीही तो मला दग्ध करीत आहे; मग मी जर त्याला विसरेन तर तो माझी काय दशा करील?

Tamil Transliteration
Marappin Evanaavan Markol Marappariyen
Ullinum Ullam Sutum.

Explanations
Holy Kural #१२०८
माझ्या प्रियकराला मी मनात सारखे आठवीत बसले तरी त्याला राग येत नाही. त्याची किती ही कृपा माझ्यावर!

Tamil Transliteration
Enaiththu Ninaippinum Kaayaar Anaiththandro
Kaadhalar Seyyum Sirappu.

Explanations
Holy Kural #१२०९
"आपण दोन नसून एक आहोत" असे म्हणणान्या त्या प्रियकरच्या निष्‍ठुरपणाचा जेव्हा मी विचार करू लागते, तेव्हा माझे जीवनच खरोखर समाप्‍त होतो.

Tamil Transliteration
Viliyumen Innuyir Verallam Enpaar
Aliyinmai Aatra Ninaindhu.

Explanations
Holy Kural #१२१०
माझ्या हृदयात सतत असूनही तो दूर गेला आहे; तेव्हा माझे जीवनच खरोखर समाप्‍त होते.

Tamil Transliteration
Vitaaadhu Sendraaraik Kanninaal Kaanap
Pataaadhi Vaazhi Madhi.

Explanations
🡱