नियती (दैव)

Verses

Holy Kural #३७१
दैवाची कृपा व्यायची असली म्हणजे मनुष्याला निश्‍चय-बुद्धीही येते; परंतु दैव सोडून जाणार असेल तर आलस्य येऊन मीठी मारते.

Tamil Transliteration
Aakoozhaal Thondrum Asaivinmai Kaipporul
Pokoozhaal Thondrum Mati.

Explanations
Holy Kural #३७२
दुर्दैवाचा फेरा येणे म्हणजे मनुष्याची मनःशक्‍तीमंद होणे, बुद्धिमंद होणे; परंतु दैवाची कृपा व्हायची असेल तर बुद्धीचाही विकास होऊ लागतो.

Tamil Transliteration
Pedhaip Patukkum Izhavoozh Arivakatrum
Aakaloozh Utrak Katai.

Explanations
Holy Kural #३७३
दैवच तुम्हांला ओढीत नेऊ लागले, तर सर्वांच्या दोळयांवर जणू पटल येते; मग तुमची विद्या, तुमची बुद्धी, यांचा काही उपयोग नसतो.

Tamil Transliteration
Nunniya Noolpala Karpinum Matrundhan
Unmai Yarive Mikum.

Explanations
Holy Kural #३७४
जगाचे परस्परविरोधीअसे दोन भाग पडतात. यशस्वी जीवन आणि साधुता या दोन भिन्न गोष्‍टी आहेत.

Tamil Transliteration
Iruveru Ulakaththu Iyarkai Thiruveru
Thelliya Raadhalum Veru.

Explanations
Holy Kural #३७५
जेव्हा काळ तुझ्या विरुद्धच असेल, तेव्हा चांगल्या गोष्‍टीही वाईट होतील; परंतु वेळ बदलताच वाईटाचेही चांगले होईल.

Tamil Transliteration
Nallavai Ellaaan Theeyavaam Theeyavum
Nallavaam Selvam Seyarku.

Explanations
Holy Kural #३७६
तू कितीही काळजी घेतलीस तरी दैवाच्या मनात जे तुला द्यावयाचे आहे, ते तू नको नको म्हटलेस तरी तुझ्याजवळून जाणार नाही.

Tamil Transliteration
Pariyinum Aakaavaam Paalalla Uyththuch
Choriyinum Pokaa Thama.

Explanations
Holy Kural #३७७
दैव सर्वशासक आहे. त्याच्या आज्ञेवाचून तुला तुझ्या अगणित संपत्तीचा उपभोग घेता येणार नाही.

Tamil Transliteration
Vakuththaan Vakuththa Vakaiyallaal Koti
Thokuththaarkku Thuyththal Aridhu.

Explanations
Holy Kural #३७८
या जगात रंजले गांजलेले शेवटी वैराग्याकडे मन वळवतात; परंतु जी दुःखे त्यांच्या निशिबी आहेत, त्यांच्या भोगासाठी दैव त्यांचा पाठपुरावा करते, त्यांना अडवून ठेवते.

Tamil Transliteration
Thurappaarman Thuppura Villaar Urarpaala
Oottaa Kazhiyu Menin.

Explanations
Holy Kural #३७९
चांगले झाले असता जे उडया मारतात, तेव वाईट झाले असता का रडू लागतात? का दुःखीकष्‍टी होतात?

Tamil Transliteration
Nandraangaal Nallavaak Kaanpavar Andraangaal
Allar Patuva Thevan?.

Explanations
Holy Kural #३८०
नियतीहून, दैवाहून बलवान असे काय आहे? प्राणी आपणांस खाऊ पाहणान्या दैवावर विजय मिळविण्याचे बेत करीत असतो; परंतु दैव त्याला आधीच बांधून खाली खेचते.

Tamil Transliteration
Oozhir Peruvali Yaavula Matrondru
Soozhinun Thaanmun Thurum.

Explanations
🡱