प्रेमकलहातील सूक्ष्मता

Verses

Holy Kural #१३११
हे लबाडा, हेनारीप्रिया, जेवढया म्हणून स्त्रिया आहेत, त्या सान्या आपल्या डोळयांनी तुला जणू खाऊनपिऊन टाकतात; मला नको जा तुझे आलिंगनफिलिंगन

Tamil Transliteration
Penniyalaar Ellaarum Kannin Podhuunpar
Nannen Paraththanin Maarpu.

Explanations
Holy Kural #१३१२
मी रागावलेली होते नि नेमकी त्याच वेळेस शिंक आली. "माझ्या प्रियाला शतायुषी कर" असे मी म्हणेन असे त्याला वाटले.

Tamil Transliteration
Ooti Irundhemaath Thumminaar Yaamdhammai
Neetuvaazh Kenpaak Karindhu.

Explanations
Holy Kural #१३१३
मी तिच्या गळयात हार घातला तरी "तुला दुसन्या तरुणीच्या डोळयांकडे बघायचे आहे" असे म्हणून ती फणकान्याने निघून जाते.

Tamil Transliteration
Kottup Pooch Chootinum Kaayum Oruththiyaik
Kaattiya Sootineer Endru.

Explanations
Holy Kural #१३१४
मी जर तिला म्हटले की, "सर्वांपेक्षा तुझ्यावरच मी अधिक प्रेम करतो", तरी ती लगेच उसळून विचारते, "सर्वांपेक्षा म्हणजे कोणाकोणापेक्षा?"

Tamil Transliteration
Yaarinum Kaadhalam Endrenaa Ootinaal
Yaarinum Yaarinum Endru.

Explanations
Holy Kural #१३१५
मी तिला जरी म्हटले, "आपण पुन्हा या जन्मी तरी विमुक्‍त होणार नाही", तरी तिचे डोळे भरून आले. (पुढच्या जन्मीच्या वियोगाच्या शंकेने)

Tamil Transliteration
Immaip Pirappil Piriyalam Endrenaak
Kannirai Neerkon Tanal.

Explanations
Holy Kural #१३१६
मी तिला म्हटले, "दूर होतो तेव्हा तुला मनात आठवीत असे". मला बाहुपाशात घेणारी ती एकदम रागाने दूर होऊन म्हणाली, "मल;आ विसरला होतात एकूण! म्हणून आठवण करावी लागली!"

Tamil Transliteration
Ullinen Endrenmar Renmarandheer Endrennaip
Pullaal Pulaththak Kanal.

Explanations
Holy Kural #१३१७
मला शिंक आली व तिने शुभ चिंतिले. परंतु आपला आशीर्वाद मागे घेऊन डोळयांत पाणी आणून तिने विचारले. "तुम्हांला शिंक आली. कोणी बरे तुमची आठवण काढली?

Tamil Transliteration
Vazhuththinaal Thumminen Aaka Azhiththazhudhaal
Yaarullith Thummineer Endru.

Explanations
Holy Kural #१३१८
मी माझी शिंक दाबली; तरीही ती साश्रू नयनांनी म्हणाली, "कोणती तरी तुझी दुसरी मौत्रीण तुझी आठवण करीत आहे, अशी शंका मला येऊ नये म्हणून ना शिंक दाबलीस?"

Tamil Transliteration
Thummuch Cheruppa Azhudhaal Numarullal
Emmai Maraiththiro Endru.

Explanations
Holy Kural #१३१९
तिचे सांत्वन करण्यासाठी मी नाना उपाय करावे; परंतु तिचा राग अधिकच वाढावा. कपाळाला आठया घालून तिने म्हणावे, "तुम्ही दुसन्या कोणाजवळ प्रेमकलह करताना बन्याच युक्‍त्या शिकलात एकूण!"

Tamil Transliteration
Thannai Unarththinum Kaayum Pirarkkumneer
Inneerar Aakudhir Endru.

Explanations
Holy Kural #१३२०
तिच्या सौंदर्याने वेडावून उन्मत होऊन तिच्याकडे मी पाहू लागताच ती मला म्हणते, "माझ्या सौंदर्याशी कुणाच्या सौंदर्याची मनात तुलना करीत आहात?"

Tamil Transliteration
Ninaiththirundhu Nokkinum Kaayum Anaiththuneer
Yaarulli Nokkineer Endru.

Explanations
🡱