प्रेमपावित्र्य

Verses

Holy Kural #११५१
अपला वियोग न व्हावा याविषयी बोलत असल तर बोला; परंतु लवकर परत येईन वगैरे बोलायचे असेल, तर त्या वेळेपर्यत जे कोणी जिवंत राहणार असेल त्याच्याजवळ ते बोला.

Tamil Transliteration
Sellaamai Untel Enakkurai Matrunin
Valvaravu Vaazhvaark Kurai.

Explanations
Holy Kural #११५२
त्याने एकदा पाहिलेतरी मला पूर्वी परमानंद होत असे; परंतु आता त्याच्या आलिंगनानेही दुःख होते. कारण तो लवकरच जाईल अशी आता भीती वाटते.

Tamil Transliteration
Inkan Utaiththavar Paarval Pirivanjum
Punkan Utaiththaal Punarvu.

Explanations
Holy Kural #११५३
ज्याला माझे मन माहीत आहे, त्याच्याही मनात मला सोडून जाण्याचा विचार लपून असावा हे पाहून कोणवरही विध्‍वास ठेवणे अशक्य झाले आहे.

Tamil Transliteration
Aridharo Thetram Arivutaiyaar Kannum
Pirivo Ritaththunmai Yaan.

Explanations
Holy Kural #११५४
"आनंदी राहा" असे ज्याने आपन होऊन मला सांगावे, त्यानेच माझ्याजवळून दूर जाण्याचा विचार करावा, किती दुःखाची गोष्‍ट! त्याच्या गंभीरपणे दिलेल्या वचनावर मी विश्‍वास ठेवीत नाही म्हणून त्याने का म्हणून मला दोष द्यावा?

Tamil Transliteration
Aliththanjal Endravar Neeppin Theliththasol
Theriyaarkku Unto Thavaru.

Explanations
Holy Kural #११५५
हे सखी, माझे प्राण राहावेत असे तुला वाटत असेल तर माझा प्राणसखा दूर जाऊ नकोस; कारण जर तो दूर गेला तर तो परत येईल त्या वेळेस त्याचे स्वागत करायला मी जिवंत असेन की नाही शंका आहे.

Tamil Transliteration
Ompin Amaindhaar Pirivompal Matravar
Neengin Aridhaal Punarvu.

Explanations
Holy Kural #११५६
मी निघून जाईन, असे माझ्या तोंडावर सांगण्याइतकी निष्‍ठुरता त्याच्याजवळ आहे. तो माझे प्राण राहावे म्हणून परत येईल, अशी मला अशा नाही.

Tamil Transliteration
Pirivuraikkum Vankannar Aayin Aridhavar
Nalkuvar Ennum Nasai.

Explanations
Holy Kural #११५७
या घट्ट असनान्या बांगडया सैल झाल्या हे पाहून तरी निघून जाण्याचे जे भूत त्याच्या मनात आले आहे ते निघून नाही का जाणार?

Tamil Transliteration
Thuraivan Thurandhamai Thootraakol Munkai
Iraiiravaa Nindra Valai.

Explanations
Holy Kural #११५८
जिवाचे जिवलग जेथे नाहीत तेथे जगणे म्हणजे दुःखद होय; परंतु प्रियकरापासून नियुक्‍त होणे हे त्याहूनही दुःखद आहे.

Tamil Transliteration
Innaadhu Inaniloor Vaazhdhal Adhaninum
Innaadhu Iniyaarp Pirivu.

Explanations
Holy Kural #११५९
अग्नीचा स्पर्श होईल तेव्हाच तो भाजतो, परंतु प्रीती दूर असली म्हणजेच फार दाह करते.

Tamil Transliteration
Thotirsutin Alladhu Kaamanoi Pola
Vitirsutal Aatrumo Thee.

Explanations
Holy Kural #११६०
निरोप देण्याचे व वियोगाचे दुःख सोसूनही प्रियकराच्या पुनरागमनापर्यत जीव धरून राहिल्याची उदाहरणे नसतील का?

Tamil Transliteration
Aridhaatri Allalnoi Neekkip Pirivaatrip
Pinirundhu Vaazhvaar Palar.

Explanations
🡱