प्रेमी जीवांची भेटग्यासाठी ओढ

Verses

Holy Kural #१२६१
प्रेमी डोळयांतील तेज लेपून ते मंद झाले. भिंतीचर खुणा केलेले दिवस रोज मोजून मोजून ही माझी बोटे झिजून गली.

Tamil Transliteration
Vaalatrup Purkendra Kannum Avarsendra
Naalotrith Theyndha Viral.

Explanations
Holy Kural #१२६२
सखी, त्याला आता मी विसरले म्हणून काय झाले? माझे सौंदर्य मला आधीच सोडून गेले आहे आणि ही काकणेही गळून पडली आहेत.

Tamil Transliteration
Ilangizhaai Indru Marappinen Tholmel
Kalangazhiyum Kaarikai Neeththu.

Explanations
Holy Kural #१२६३
तो परत यावा या इच्छेने मी जर जिवंत राहीले, तरच विजयेच्छेने मला सोडून जणान्या त्याचा विजय.

Tamil Transliteration
Urannasaii Ullam Thunaiyaakach Chendraar
Varalnasaii Innum Ulen.

Explanations
Holy Kural #१२६४
माझ्या भावना मातीमोल समजून मला सोडूनतो गेला तो गेला; परंतु तो लवकरच परत येईल, या विचारानेसुद्धा माझे हृदय थयथय नाचू लागते.

Tamil Transliteration
Kootiya Kaamam Pirindhaar Varavullik
Kotuko Terumen Nenju.

Explanations
Holy Kural #१२६५
हे डोळे एकदा त्याला पुन्हा पोटभर पाहू देत; लगेच या माझ्या कृश बाहूंवरील पांडुरता पळून जाईल.

Tamil Transliteration
Kaankaman Konkanaik Kannaarak Kantapin
Neengumen Mendhol Pasappu.

Explanations
Holy Kural #१२६६
प्रियकराला घरी येऊ दे; लगेच त्याचे दर्शनामृत सेवून हा शरीर्मारक विरहरोग मी नष्‍ट करीन.

Tamil Transliteration
Varukaman Konkan Orunaal Parukuvan
Paidhalnoi Ellaam Keta.

Explanations
Holy Kural #१२६७
माझ्या या डोळयांप्रमाणे मला प्रिय असणारा तो प्रियकर घरी येताच, तो फार दिवस दूर राहिला म्हणून मी रुसेन, रागावेन की त्याला मीठी मारीन? की हे सारे प्रकार करीन?

Tamil Transliteration
Pulappenkol Pulluven Kollo Kalappenkol
Kananna Kelir Viran.

Explanations
Holy Kural #१२६८
लढाई आता एकदम सुरू होऊ दे नी राजाला जय मिळू दे! मला लवकर सायंकाळी घरी जाऊ दे नि प्रियेसह आनंदभोजन करू दे.

Tamil Transliteration
Vinaikalandhu Vendreeka Vendhan Manaikalandhu
Maalai Ayarkam Virundhu.

Explanations
Holy Kural #१२६९
ज्या दिवस मोजीत असतात, प्रियकर कधी परत येईल म्हणुन झुरत असतात, त्यांना एकेक दिवस युगासारखा वाटतो.

Tamil Transliteration
Orunaal Ezhunaalpol Sellumsen Sendraar
Varunaalvaiththu Engu Pavarkku.

Explanations
Holy Kural #१२७०
मी जाऊन भेटण्यापूर्वीच प्रियेचे हृदय जर दुभंगून गेले असेल, तर मी जाऊन काय उपयोग?

Tamil Transliteration
Perinennaam Petrakkaal Ennaam Urinennaam
Ullam Utaindhukkak Kaal.

Explanations
🡱