बाईलवेडे

Verses

Holy Kural #९०१
बाईलवेडयांना मोठेपणास मुकावे लागते. मोठमोठया गोष्‍टी आपण करू, अशी ज्यांना महत्त्वकांक्षा असेल त्यांनी या मोहापासून दूर राहवे.

Tamil Transliteration
Manaivizhaivaar Maanpayan Eydhaar Vinaivizhaiyaar
Ventaap Porulum Adhu.

Explanations
Holy Kural #९०२
अती स्त्रैणाची विलासलालसा लोकांत उदाहरण न्हणून दाखविली जाईल व लज्जेने त्याला मान खाली घालावी लागेल.

Tamil Transliteration
Penaadhu Penvizhaivaan Aakkam Periyadhor
Naanaaka Naanuth Tharum.

Explanations
Holy Kural #९०३
पत्‍नीसमोर लाळ घोटण्यान्याला थो रांमोठयांसमोर तोंड दाखवायला जागा नसते.

Tamil Transliteration
Illaalkan Thaazhndha Iyalpinmai Egngnaandrum
Nallaarul Naanuth Tharum.

Explanations
Holy Kural #९०४
जो आपल्या पत्‍नीचा दास आहे, त्याला मोक्ष नाही. त्याची बुद्धी पै कीमतीची समजा.

Tamil Transliteration
Manaiyaalai Anjum Marumaiyi Laalan
Vinaiyaanmai Veereydha Lindru.

Explanations
Holy Kural #९०५
जो आपल्या पत्‍नीलाही भितो, तो थोरांमोठयांची सेवा कशी करणार?

Tamil Transliteration
Illaalai Anjuvaan Anjumar Regngnaandrum
Nallaarkku Nalla Seyal.

Explanations
Holy Kural #९०६
पत्‍नीच्या सुकुमार बाहुपाशांना भिऊन जे उभे राहतात, ते देवांप्रमाणे राहीले, वागले, तरी त्यांना कोणीही मान देणार नाही.

Tamil Transliteration
Imaiyaarin Vaazhinum Paatilare Illaal
Amaiyaardhol Anju Pavar.

Explanations
Holy Kural #९०७
राज्यकारभारात जो बायकांचे बंड चालू देतो, त्याच्याहून विनयशील कुमारिका अशिक थोर नि श्रेष्‍ठ आहे.

Tamil Transliteration
Penneval Seydhozhukum Aanmaiyin Naanutaip
Penne Perumai Utaiththu.

Explanations
Holy Kural #९०८
बायकोच्या मुठीत वागणारे आपल्या मित्रांच्या गरजा पुरवू शकणार नाहीत, कोणतेही चांगले काम करू शकणार नाहीत.

Tamil Transliteration
Nattaar Kuraimutiyaar Nandraatraar Nannudhalaal
Pettaangu Ozhuku Pavar.

Explanations
Holy Kural #९०९
जे स्त्रियांच्या हाती सत्ता देऊन त्यांच्या तंत्राने वागतात, त्यांना धर्मार्थ नाहीतच; परंतु प्रेमाचाही खरा आनंद त्यांना लाभणार नाही.

Tamil Transliteration
Aravinaiyum Aandra Porulum Piravinaiyum
Peneval Seyvaarkan Il.

Explanations
Holy Kural #९१०
मोठया गोष्‍टी मनात खेळविणारे, ज्यांच्यावर ईश्‍वरी कृपा असते, ते स्त्रैणपणाचा मूर्खपणा कधीही करणार नाहीत.

Tamil Transliteration
Enserndha Nenjath Thitanutaiyaarkku Egngnaandrum
Penserndhaam Pedhaimai Il.

Explanations
🡱