मंत्री

Verses

Holy Kural #६३१
मोठमोठया गोष्‍टी कशा सिद्धीस न्याव्या, तदर्थ साधने कोणती, मार्ग कोणते, आरंभ केन्हा करावा, हे सारे जो जाणतो तो मंत्री नेमण्यास योग्य होय.

Tamil Transliteration
Karuviyum Kaalamum Seykaiyum Seyyum
Aruvinaiyum Maantadhu Amaichchu.

Explanations
Holy Kural #६३२
ज्ञान, निश्‍चय, अदम्य श्रम, प्रजेच्या हिताकडे अखंड प्रेमळ दृष्‍टी, आणि वरचे एक, अशी मंत्र्याची पाच लक्षणे होत.

Tamil Transliteration
Vankan Kutikaaththal Katraridhal Aalvinaiyotu
Aindhutan Maantadhu Amaichchu.

Explanations
Holy Kural #६३३
जो विभक्‍तांना एकत्र अणू शकतो, एकत्र असलेल्यांत फूट पाडू शकतो, अस्तित्वात असलेले स्नेहसंबंध सांभालू शकतो, तो खरा समर्थ मंत्री होय.

Tamil Transliteration
Piriththalum Penik Kolalum Pirindhaarp
Poruththalum Valla Thamaichchu.

Explanations
Holy Kural #६३४
कोणते बेत करावे हे जो ठरवतो, ते बेत कसे पार पाडावे हे जो जाणतो, ज्याचे मत नेहमी निश्‍चित नि निर्णायक असते, तो योग्य मंत्री असे समजावे.

Tamil Transliteration
Theridhalum Therndhu Seyalum Orudhalaiyaach
Chollalum Valladhu Amaichchu.

Explanations
Holy Kural #६३५
जो विधिज्ञ आहे, धर्मज्ञ आहे, जो पुष्‍कल अध्ययन केलेला आहे, जो विचारपूर्वक बोलतो, प्रसंगोचित जाणतो, तो योग्य मंत्री होय.

Tamil Transliteration
Aranarindhu Aandramaindha Sollaanenj Gnaandrun
Thiranarindhaan Therchchith Thunai.

Explanations
Holy Kural #६३६
उपजत बुद्धिमान असून अध्ययनाने ज्यांनी भरपूर ज्ञान मिळविले आहे, त्यांना जगात दुर्बोध असे काय आहे, सूक्ष्म असे काय आहे?

Tamil Transliteration
Madhinutpam Noolotu Utaiyaarkku Adhinutpam
Yaavula Munnir Pavai.

Explanations
Holy Kural #६३७
तू पुस्तकी पंडित असलास तरी अनुभवाने येणारे शहाणपण मिळव नि तदनुसार वाग.

Tamil Transliteration
Seyarkai Arindhak Kataiththum Ulakaththu
Iyarkai Arindhu Seyal.

Explanations
Holy Kural #६३८
राजा मूर्ख असला, पदोपदी मंत्र्यांच्या कामात अडथळे आणीत असला, तरीही मंत्र्याने त्याला योग्य नि रास्त तेच नेहमी सांगत राहावे.

Tamil Transliteration
Arikondru Ariyaan Eninum Urudhi
Uzhaiyirundhaan Kooral Katan.

Explanations
Holy Kural #६३९
जो मंत्री गुप्‍त कारस्थाने करून राजाचाच नाश करो बगतो, तो सात कोटी शत्रूपेक्षाही भयंकर होय.

Tamil Transliteration
Pazhudhennum Mandhiriyin Pakkadhadhul Thevvor
Ezhupadhu Koti Urum.

Explanations
Holy Kural #६४०
जे दृढमती नसतात, ते मोठमोठया योजना आखतात; परंतु प्रत्यक्ष कृतीच्या वेळेस कचरतात. त्यांचे हेतू कधीही तडीस जाणार नाहीत.

Tamil Transliteration
Muraippatach Choozhndhum Mutivilave Seyvar
Thirappaatu Ilaaa Thavar.

Explanations
🡱