मीलनोत्कंठा

Verses

Holy Kural #१२८१
मनात नुसता विचार येताच अपार आनंद होणे, दर्शन होताच सुखसागर उसळणे, या गोष्‍टी मदिरेत नाहीत; या फक्‍त प्रेमतच असू शकतात.

Tamil Transliteration
Ullak Kaliththalum Kaana Makizhdhalum
Kallukkil Kaamaththir Kuntu.

Explanations
Holy Kural #१२८२
विरहाने शिंदीच्या अणुकुचीदार टोकांवर बसण्याहूनही अधिक विव्हल होत असले तरीही त्याच्यावर थोडेसुद्धा रागावण्याची मनात इच्छा नाही.

Tamil Transliteration
Thinaiththunaiyum Ootaamai Ventum Panaith Thunaiyum
Kaamam Niraiya Varin.

Explanations
Holy Kural #१२८३
त्याला जरी माझी पर्वा नसली व तो वाटेल तसे वर्तन करीत असला, तरी त्याला पाहिल्याशिवाय माझ्या डोळयांचे समाधान होणार नाही.

Tamil Transliteration
Penaadhu Petpave Seyyinum Konkanaik
Kaanaa Thamaiyala Kan.

Explanations
Holy Kural #१२८४
सखी, खरोखरच मला त्याच्यावर रागवावयाचे होते, परंतु हृदयाला या गोष्‍टीचा विसर पडला नि ते त्याला भेटयाला धावले.

Tamil Transliteration
Ootarkan Sendrenman Thozhi Adhumarandhu
Kootarkan Sendradhu En Nenju.

Explanations
Holy Kural #१२८५
शलाकेने डोळयांत अंजन घालीत असताना, शलाकेचे अंजन ज्याप्रमाणे डोळयांना दिसत नाही, त्याप्रमाणे प्रियकर जवळ असला म्हणजे त्याचे दिष मला दिसत नाहीत.

Tamil Transliteration
Ezhudhungaal Kolkaanaak Kannepol Konkan
Pazhikaanen Kanta Itaththu.

Explanations
Holy Kural #१२८६
तो समोय असला म्हणजे तो निर्दोष वाटतो; दूर गेला म्हणजे तो केवळ दोषमूर्ती दिसतो.

Tamil Transliteration
Kaanungaal Kaanen Thavaraaya Kaanaakkaal
Kaanen Thavaral Lavai.

Explanations
Holy Kural #१२८७
प्रवाहात वाहून नेणारा एक अंतःप्रवाह आहे, हे माहीत असताना त्यात कोण उडी घेईल? तो जवळ असल्यावर माझा राग उरत नाही हे जर मला माहीत आहे, तर त्याच्यावर उगाच कशाला राग करू?

Tamil Transliteration
Uyththal Arindhu Punalpaai Pavarepol
Poiththal Arindhen Pulandhu.

Explanations
Holy Kural #१२८८
लाजेने खाली मान घालायला लावीत असली तरी मदिरा पाहून मद्याप्याला दुःख का होते? त्याप्रमाणे, हे लबाडा, तुझे हृदय मला आहे.

Tamil Transliteration
Iliththakka Innaa Seyinum Kaliththaarkkuk
Kallatre Kalvanin Maarpu.

Explanations
Holy Kural #१२८९
फुलाहूनही प्रेम सुकुमार आहे. फारच ठोडयांना हे समजते नि तदनुरूप ते वागतात. (ती कोमलता तुला समजत नाही म्हणून तू रागावून मला व्यथित करतेस, हा भाव.)

Tamil Transliteration
Malarinum Mellidhu Kaamam Silaradhan
Sevvi Thalaippatu Vaar.

Explanations
Holy Kural #१२९०
जेव्हा तिने मला पाहिले तेव्हा तिच्या डोळयांत राग होता. परंतु मी जवळ जाताच मी तिच्या बाहुपाशात जाण्याऐवजी तीच त्वरेने माझ्या बाहूंत घुसली.

Tamil Transliteration
Kannin Thuniththe Kalanginaal Pulludhal
Enninum Thaanvidhup Putru.

Explanations
🡱