विरहशोक; झुरून जाणे

Verses

Holy Kural #११६१
झान्याचे पाणी किती भरले तरी पुनःपुन्हा उफालून येते; त्याप्रमाण मी माझे दुःख कितीही आत दाबून ठेवले तरी पुनःपुन्हा तरारून बाहेर पडते.

Tamil Transliteration
Maraippenman Yaaniqdho Noyai Iraippavarkku
Ootruneer Pola Mikum.

Explanations
Holy Kural #११६२
दुःख लपविणे आता माझ्या शक्‍तीबाहेरचे आहे. ते दुःख इतरांसमोर राहेच; परंतु ज्याने ते दिले त्याच्यासमोरही आपण होऊन प्रकट करण्याची मला लाज वाटते.

Tamil Transliteration
Karaththalum Aatrenin Noyainoi Seydhaarkku
Uraiththalum Naanuth Tharum.

Explanations
Holy Kural #११६३
माझ्या जीवनाच्या एका टोकाला प्रेम आहे आणि दुसन्या टोकाला विनय आहे. या दोहोंच्या ओझ्याखाली माझे हे दुबळे शरीर मात्र चिरडले जात आहे.

Tamil Transliteration
Kaamamum Naanum Uyirkaavaath Thoongumen
Nonaa Utampin Akaththu.

Explanations
Holy Kural #११६४
प्रियकराविषयीच्या प्रेमाचा सागर उसळून राहिला आहे, परंतु तो तरून जायला विश्‍वसनीय नौका माझ्याजवळ नाही.

Tamil Transliteration
Kaamak Katalmannum Unte Adhuneendhum
Emap Punaimannum Il.

Explanations
Holy Kural #११६५
मित्रासुद्धा जर एखाद्याला झूरत असता पाहू शकतात, तर शत्रू काय करणार नाहीत?

Tamil Transliteration
Thuppin Evanaavar Mankol Thuyarvaravu
Natpinul Aatru Pavar.

Explanations
Holy Kural #११६६
प्रेमजन्म आनंद सागराप्रमाणे असतो; परंतु प्रेम दग्ध करू लागले म्हणजे होणान्या वेदना त्या आनंदाहूनही खोल नि अनंत असतात.

Tamil Transliteration
Inpam Katalmatruk Kaamam Aqdhatungaal
Thunpam Adhanir Peridhu.

Explanations
Holy Kural #११६७
प्रेमाच्या प्रक्षुब्ध सागरात मी पाहेत आहे; परंतु मला किनाराकोठेच दिसत नाही; मध्यरात्रीमी अगदी एकटी असते; माझे सांत्वन करायला चिटपाखरूही जवळ नसतो.

Tamil Transliteration
Kaamak Katumpunal Neendhik Karaikaanen
Yaamaththum Yaane Ulen.

Explanations
Holy Kural #११६८
कृपाळू रात्र येते नि प्राणिमात्राला झोपविते. परंतु त्या रात्रीला मात्र माझ्याशिवाय कोणाचीच सोबत नसते.

Tamil Transliteration
Mannuyir Ellaam Thuyitri Aliththiraa
Ennalladhu Illai Thunai.

Explanations
Holy Kural #११६९
त्या निर्दय प्रियकरपेक्षाही हळूळू जाणारी ही रात्र अधिकच निर्दय वाटत आहे.

Tamil Transliteration
Kotiyaar Kotumaiyin Thaamkotiya Innaal
Netiya Kazhiyum Iraa.

Explanations
Holy Kural #११७०
तो जेथे आहे तेथे माझे हृदय धावते; दोळयांनाही अशी धाव घेता येती तर त्यांना अश्र्य्सागरात पोहावे लागले नसते.

Tamil Transliteration
Ullampondru Ulvazhich Chelkirpin Vellaneer
Neendhala Mannoen Kan.

Explanations
🡱