विवेक

Verses

Holy Kural #५७१
विवेक-देवतेचे स्वरूप किती रमणीय आहे! हे जग कोणामुळे नीट चालत असेल तर निच्यामुळे होय.

Tamil Transliteration
Kannottam Ennum Kazhiperung Kaarikai
Unmaiyaan Untiv Vulaku.

Explanations
Holy Kural #५७२
जीवनातील समाधान नि शांती, जीवनातील आनंद ने सौंदर्य विवेकामुळे असतात. ज्यांच्याजवळ विवेक नाही, धीर नाही, ते पृथ्वीला भार आहेत.

Tamil Transliteration
Kannottath Thulladhu Ulakiyal Aqdhilaar
Unmai Nilakkup Porai.

Explanations
Holy Kural #५७३
जे गीत रागदारीत बसवून गाता येत नाही, त्याचा काय उपयोग? ज्या डोळयांत प्रेमळपणा नाही त्यांचा काय उपयोग?

Tamil Transliteration
Panennaam Paatarku Iyaipindrel Kanennaam
Kannottam Illaadha Kan.

Explanations
Holy Kural #५७४
त्या त्या माणसाच्या योग्यतेनुरूप जे डोले प्रसन्नता नि शांती दाखवीत नाहीत, ते तोंडावर असून काय उपयोग?

Tamil Transliteration
Ulapol Mukaththevan Seyyum Alavinaal
Kannottam Illaadha Kan.

Explanations
Holy Kural #५७५
प्रसन्नता हा डोळयांचा अलंकार आहे. ज्या डोळयांत माधुर्य नाही, ते डोळे नसून खाच होय.

Tamil Transliteration
Kannirku Anikalam Kannottam Aqdhindrel
Punnendru Unarap Patum.

Explanations
Holy Kural #५७६
ज्याचे डोळे दुसन्यांची पर्वा करीत नाहीत, दुसन्यांविषयी सद्‍भाव दाखवीत नाहीत, तो मनुष्य जमिनीत उभ्या असलेल्या झाडाप्रमाणे होय.

Tamil Transliteration
Manno Tiyaindha Maraththanaiyar Kanno
Tiyaindhukan Notaa Thavar.

Explanations
Holy Kural #५७७
जे दुसन्यांविषयी तिळभरही पर्वा दाखवीत नाहीत्ते खरोखर आंधळे आहेत; दुसन्यांच्या दोषांकडेही जे प्रेमळपणे पाहतात तेच खरोखर डोळस होत.

Tamil Transliteration
Kannottam Illavar Kannilar Kannutaiyaar
Kannottam Inmaiyum Il.

Explanations
Holy Kural #५७८
आपल्या कर्तव्यापासून च्युत न होता, दुसन्याविषयी जो सहानुभूती दाखवितो, तो या पृथ्वीचा स्वामी होईल.

Tamil Transliteration
Karumam Sidhaiyaamal Kannota Vallaarkku
Urimai Utaiththiv Vulaku.

Explanations
Holy Kural #५७९
अपराध्यावरही प्रेम करणे, त्याला क्षामा करणे, यातच मनाचा खरा मोठेपणा आहे.

Tamil Transliteration
Oruththaatrum Panpinaar Kannumkan Notip
Poruththaatrum Panpe Thalai.

Explanations
Holy Kural #५८०
ज्यांना मूर्तिमंत क्षमा व्हायचे आहे, ते डोळयांसमोर विष मिसळून दिले जात असताही विश्‍वासाने ते पिऊन टाकतील.

Tamil Transliteration
Peyakkantum Nanjun Tamaivar Nayaththakka
Naakarikam Ventu Pavar.

Explanations
🡱