सत्याचा साक्षात्कार

Verses

Holy Kural #३५१
सारभूत वस्तू सोडून असाराचा स्वीकार करणे म्हणजे केवढा मोह! त्यामुळे जीव पुनःपुन्हा या दुःखमय संसारात पडतो.

Tamil Transliteration
Porulalla Vatraip Porulendru Unarum
Marulaanaam Maanaap Pirappu.

Explanations
Holy Kural #३५२
जो मोहनिर्मुक्‍त झाला, त्याची दृष्टी निर्मल झाली. अज्ञानांधकार त्याला घेरीत नाही; आनंद त्याच्याजवल येतो.

Tamil Transliteration
Irulneengi Inpam Payakkum Marulneengi
Maasaru Kaatchi Yavarkku.

Explanations
Holy Kural #३५३
ज्याचे संधय फिटले, ज्याला सत्याचा साक्षात्‍कार झाला, त्याला पृथ्वीहून स्वर्ग जवळ असतो.

Tamil Transliteration
Aiyaththin Neengith Thelindhaarkku Vaiyaththin
Vaanam Naniya Thutaiththu.

Explanations
Holy Kural #३५४
मनुष्यजन्म मिळूनही जर सत्याचा साक्षात्‍कार करूण घेणार नसाल, तर कोणते हित साधलेत?

Tamil Transliteration
Aiyunarvu Eydhiyak Kannum Payamindre
Meyyunarvu Illaa Thavarkku.

Explanations
Holy Kural #३५५
कोणतीही वस्तू असो; तिच्यासंबंधी सारासार विवेक करणे यालाच प्रज्ञत्व म्हणतात, शहाणपण म्हणतात.

Tamil Transliteration
Epporul Eththanmaith Thaayinum Apporul
Meypporul Kaanpadhu Arivu.

Explanations
Holy Kural #३५६
खोल विचात करून ज्याने सत्याची अनुभूती घेतलीतो अशा मार्गाने जाईल की जेणेकरून जन्म-मरणाची यातायात पुनश्‍च पाठीस लगणार नाही.

Tamil Transliteration
Katreentu Meypporul Kantaar Thalaippatuvar
Matreentu Vaaraa Neri.

Explanations
Holy Kural #३५७
सत्याचे चिंतन करून ज्यांनी ते मिळविले त्यांना 'पुनरपि जननं; पुनरपि मरणं' चा विचार करायला नको.

Tamil Transliteration
Orththullam Ulladhu Unarin Orudhalaiyaap
Perththulla Ventaa Pirappu.

Explanations
Holy Kural #३५८
जन्म-मरणाच्या फेन्यात पडण्याचा मूर्खपणा होऊ नये म्हणूण सत्याच्या नि पूर्णाच्या प्राप्‍तीसाठी जो प्रयत्न करतो, तोच खरा प्रज्ञावंत.

Tamil Transliteration
Pirappennum Pedhaimai Neengach Chirappennum
Semporul Kaanpadhu Arivu.

Explanations
Holy Kural #३५९
स्वोद्धाराचे मार्ग ज्याला वर्णपणे अवगत आहेत, जो सर्व प्रकारची आसक्ती जिंकून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला ज्या पापांची फळे तो भोगीत असतो, ती प्रारब्धप्राप्‍त कर्मेही सोडून जातात; त्यांच्यापासून तो मुक्‍त होतो.

Tamil Transliteration
Saarpunarndhu Saarpu Ketaozhukin Matrazhiththuch
Chaardharaa Saardharu Noi.

Explanations
Holy Kural #३६०
काम, क्रोध, मोह ज्याने जिंकले, त्याच्या सर्व दुःकांचो निवृत्तो जालो.

Tamil Transliteration
Kaamam Vekuli Mayakkam Ivaimundran
Naamam Ketakketum Noi.

Explanations
🡱