सुंदर शरीराची कृशता

Verses

Holy Kural #१२३१
तुझे सुख वाढविण्यासाठीच मी जात आहे, असे म्हणून तो गेला. हे शोळे सारखा त्याचा विचार करीत असतात. फुलांसमुर जायला त्यांना आता लाज वाटते.

Tamil Transliteration
Sirumai Namakkozhiyach Chetchendraar Ulli
Narumalar Naanina Kan.

Explanations
Holy Kural #१२३२
माझ्या हया निस्तेज डोळयांतून सारखे अश्रू गाळत आहेत. प्रिय कराचा निष्ठुरपणा ते उघड करतील की काय?

Tamil Transliteration
Nayandhavar Nalkaamai Solluva Polum
Pasandhu Panivaarum Kan.

Explanations
Holy Kural #१२३३
विवाहाच्या प्रसंगी जे बाहू आमंदाने फुगले होते, तेच आज त्याचे सोडून हाणे जगाला जाहीर करतील अशी भीती वाटते.

Tamil Transliteration
Thanandhamai Saala Arivippa Polum
Manandhanaal Veengiya Thol.

Explanations
Holy Kural #१२३४
प्रियकराचा विरहाने ज्यांचे सौंदर्य आधीच नाहीसे झाले होते, ते माझे बाहू आता इतके कृश झाले आहेत की काकणे फ़ळून पडतात.

Tamil Transliteration
Panaineengip Paindhoti Sorum Thunaineengith
Tholkavin Vaatiya Thol.

Explanations
Holy Kural #१२३५
या हातांनी आपली रमणीयताही गमावली नि काकणेही गमावली. त्या निष्‍ठुराची निष्‍ठुरता हे जगाला जाहीर करीत आहेत.

Tamil Transliteration
Kotiyaar Kotumai Uraikkum Thotiyotu
Tholkavin Vaatiya Thol.

Explanations
Holy Kural #१२३६
मी माझ्या बाहूंना कृश होण्याबद्दल, काकणे गळू देण्याबद्दल रागे भरते; कारण लोक त्याला नेर्दय म्हणून नावे ठेवतात

Tamil Transliteration
Thotiyotu Tholnekizha Noval Avaraik
Kotiyar Enakkooral Nondhu.

Explanations
Holy Kural #१२३७
हे हृदया, तुला शाबासकी हवी आहे का? तर मग त्या कठोराकडे जा; आणि माझ्या बाहूंच्या कृशत्वामुळेगावात कोण बोभाटा माजला आहे, ते त्याचा कानांवर घाल.

Tamil Transliteration
Paatu Perudhiyo Nenje Kotiyaarkken
Vaatudhot Poosal Uraiththu.

Explanations
Holy Kural #१२३८
एक दिवस आम्ही एकमेकांस आलिंगन देत होतो. मी माझे बाहू जरा ठिले करताच त्या मुग्धेचा भालप्रदेश पांढरा फटफटीत झाला.

Tamil Transliteration
Muyangiya Kaikalai Ookkap Pasandhadhu
Paindhotip Pedhai Nudhal.

Explanations
Holy Kural #१२३९
आमच्या दृढालिंगनात्श्वासोच्छवासाचा जरासा वारा शिरताच वर्षाकालीन मेघाप्रमाणे काळेभोर असणान्या तिच्या डोळयांतील तेज नि अनुराग निघून जात.

Tamil Transliteration
Muyakkitaith Thanvali Pozhap Pasapputra
Pedhai Perumazhaik Kan.

Explanations
Holy Kural #१२४०
डोळे तोंडावरील पांडुरता पाहून निस्तेज नसत होत; तर रडू लागत.

Tamil Transliteration
Kannin Pasappo Paruvaral Eydhindre
Onnudhal Seydhadhu Kantu.

Explanations
🡱