सुरापान

Verses

Holy Kural #९२१
मद्यपी माणसाचे शत्रू त्याला कधीही भिणार नाहीत; मद्यपी मिळविलेली कीर्ती गमावील.

Tamil Transliteration
Utkap Pataaar Oliyizhappar Egngnaandrum
Katkaadhal Kontozhuku Vaar.

Explanations
Holy Kural #९२२
सुरापान करू नका; सज्जनांनी आपणांस मानावे असे वाटत असेल तर दारूपासून दूर राहा.

Tamil Transliteration
Unnarka Kallai Unilunka Saandroraan
Ennap Pataventaa Thaar.

Explanations
Holy Kural #९२३
दारुडयाचे दर्शन जन्मदात्या मातेसही किळसवाणे वाटते; मग इतर सन्मान्य जनांस वाटेल यात काय आश्‍चर्य?

Tamil Transliteration
Eendraal Mukaththeyum Innaadhaal Enmatruch
Chaandror Mukaththuk Kali.

Explanations
Holy Kural #९२४
दारूचे व्यासन ज्याला लागते, त्याला लज्जदेवी सोडून जाते.

Tamil Transliteration
Naanennum Nallaal Purangotukkum Kallennum
Penaap Perungutrath Thaarkku.

Explanations
Holy Kural #९२५
स्वतःचे पैसे देऊन दारू पिणे आणि बुद्धिभ्रष्‍ट होऊन गटारात लोळणे, हा मूर्खपणाचा कळस होय.

Tamil Transliteration
Kaiyari Yaamai Utaiththe Porulkotuththu
Meyyari Yaamai Kolal.

Explanations
Holy Kural #९२६
नेहमी ताडी पिणारा नेहमी झोपी गोल्याप्रमाणे किंवा मृतवतच मानावा.

Tamil Transliteration
Thunjinaar Seththaarin Verallar Egngnaandrum
Nanjunpaar Kallun Pavar.

Explanations
Holy Kural #९२७
चोरून दारू पिऊन जे बेहोष होऊन पडतात, त्यांच्या व्यसनाचा लवकरच गवगवा होऊन फजिती होते.

Tamil Transliteration
Ullotri Ulloor Nakappatuvar Egngnaandrum
Kallotrik Kansaai Pavar.

Explanations
Holy Kural #९२८
दारुडयाने दारू म्हणजे काय ते मला मातीतही नाही, असे ढोंग तरी करू नये. कारण खोटे बोलण्याचे आणखी एक पाप ते करतात.

Tamil Transliteration
Kaliththariyen Enpadhu Kaivituka Nenjaththu
Oliththadhooum Aange Mikum.

Explanations
Holy Kural #९२९
सुरामत्तजवळ जो बुद्धिवाद करू पाहतो, सुरापानाचे तोटे त्याला समजावू पाहतो, त्याचे ते करणे म्हणजे पाण्यात बुडालेल्याजवळ मशाल शोधन्याप्रमाणे आहे.

Tamil Transliteration
Kaliththaanaik Kaaranam Kaattudhal Keezhneerk
Kuliththaanaith Theeththureei Atru.

Explanations
Holy Kural #९३०
मद्याप्याची स्थिती तुम्ही शुद्धीवर असताना पाहाल तर दारू प्यायल्यावर आपली स्थिती कशी होईल, त्याचे चित्र डोळयांसमोर नाही का आणता येणार?

Tamil Transliteration
Kallunnaap Pozhdhir Kaliththaanaik Kaanungaal
Ullaankol Untadhan Sorvu.

Explanations
🡱