हृदयाची कानउघाडणी

Verses

Holy Kural #१२९१
त्याचे हृदय त्याचा इच्छेप्रमाणे कसे वागते, हे तू बघतोस; मग माझ्या हृदया, तूही माझे का रे ऐकत नाहीस?

Tamil Transliteration
Avarnenju Avarkkaadhal Kantum Evannenje
Neeemakku Aakaa Thadhu.

Explanations
Holy Kural #१२९२
हे हृदय, तो माझी कशी उपेक्षा करतो, ते तू पाहतोस. तरीही त्याला मित्र समजूनच तू त्याच्याकडे जातोस.

Tamil Transliteration
Uraaa Thavarkkanta Kannum Avaraich
Cheraaarenach Cheriyen Nenju.

Explanations
Holy Kural #१२९३
हे हृदया, तू आपल्या गोड इच्छेने नि आनंदाने त्याच्या पाठोपाठ जातोस. जे दुर्दैवी असतात त्यांना मित्र नसतात, हेच तू मला शिकवीत आहेस, होय ना? (कारण तूही माझ्या सोबतीका राहत नाहीस)

Tamil Transliteration
Kettaarkku Nattaaril Enpadho Nenjenee
Pettaangu Avarpin Selal.

Explanations
Holy Kural #१२९४
त्याच्या संगतीत आनंद होतो हे न दाखविता प्रेमकलहात सामील होण्याची, हे मना, तुझी इच्छा नाही; ठीक! असल्या गोष्‍टीत मी पुनश्‍च तुला विश्‍वासात घेणार नाही.

Tamil Transliteration
Inianna Ninnotu Soozhvaaryaar Nenje
Thuniseydhu Thuvvaaikaan Matru.

Explanations
Holy Kural #१२९५
त्याची भेट होणार नाही म्हणून आधी झुरते; भेटल्यावर पुन्हा वियोग होईल या विचाराने मी झुरते; माझ्या हृदयदेवनांना अंत नाही.

Tamil Transliteration
Peraaamai Anjum Perinpirivu Anjum
Araaa Itumpaiththen Nenju.

Explanations
Holy Kural #१२९६
माझ्या हृदयाचा मला उपयोग तरी काय? मी एकटी विचार करीत बसते तेव्हा माझे हऋदय मलाच खाऊ लागते.

Tamil Transliteration
Thaniye Irundhu Ninaiththakkaal Ennaith
Thiniya Irundhadhen Nenju.

Explanations
Holy Kural #१२९७
त्याची आठावण विसरून आपला स्वभिमान सांभाळणे, ही गोष्‍ट या हृदयाला माहीतच नाही. अशा या हृदयाच्या संगतीत राहून मीही माझी धीरता गमावून बसले आहे.

Tamil Transliteration
Naanum Marandhen Avarmarak Kallaaen
Maanaa Matanenjir Pattu.

Explanations
Holy Kural #१२९८
ज्याच्यावर आपण प्रेम केले, त्याची बाजू कमी ठरू नये, असे या हृदयाला वाटते; म्हणून ते नेहमी त्याची बाजू घेते.

Tamil Transliteration
Ellin Ilivaamendru Enni Avardhiram
Ullum Uyirkkaadhal Nenju.

Explanations
Holy Kural #१२९९
दुःखी मनुष्याला त्याचा दुःखात कोण बरे आधार देईल? प्रियेचे हृदय जर धावून येणार नसेल तर दुसरे कोण आहे?

Tamil Transliteration
Thunpaththirku Yaare Thunaiyaavaar Thaamutaiya
Nenjan Thunaiyal Vazhi.

Explanations
Holy Kural #१३००
माझे मनुष्याला जर माझी बाजू घेत नसेल, तर दुसन्यांना माझी पर्वा वाटत नाही यात काय आश्‍चर्य? (दुसरे म्हणजे प्रिया)

Tamil Transliteration
Thanjam Thamarallar Edhilaar Thaamutaiya
Nenjam Thamaral Vazhi.

Explanations
🡱